फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

बुधवार, २९ डिसेंबर, २०१०


आधार
अलगद का होईना
तुझा हात तू माझ्या हातात दिला होतास
काहि काळ का असो
माझ्या खान्द्याचा तू आधार घेतला होतास

तू माझी
 
त्या दिवशी तु फक्त माझी
आणि माझी झाली होतीस
कमरेला माझ्या हात घालून
जेंव्हा तू घट्ट बिलगली होतिस

आपले
अजुन तरी काहीच नव्हते
तुझे माझे म्हणण्या जोगे
सर्व काही आपले होते
एकत्र प्रेम करण्या जोगे

तुझे नाव
आज ही माझी सकाळ
तुझे नाव घेऊन होते
आणि तुझ्याच स्वप्नां मध्दे
माझी सर्व रात्र जाते

प्रेमळ हाथ
डबडबलेल्या आसवानां बाहेर येण्या साठी
पापण्या मिटाव्या लागतात
ते अश्रु टीपण्या साठी
प्रेमळ हाथच असावे लागतात

लाट
सागरची प्रत्येक लाट
माझ्या ओळखिची होति
कारण ती त्याच्या येवढिच
माझीही होती

अलगद
अलगद धरलेला हात तू
अलगदच सोडला होतास
आणि स्वप्नात  बांधलेला संसार
तू अलगदच मोडला होतास

तारुण्य
गवतावरील दव-बिंदू
म्हणजे तुझे तारुण्य
तुझी मीठी म्हणजे
प्रेमाचे अरण्य

हृदय
तुझे नाव घ्यायला आता मला
माझया ह्रदयाला  विचारव लागतय
बघितलस माझ  हृदय ही आता
अगदी तुझया सारखच वागतय 

वळण
त्या वळणावर मी  तुला
पुन्हा वळून पाहिले
काय करू तुला पहिल्या शिवाय
नाही राहवले

पापनी
तुज्या  डोळ्याना पाहिल्यावर
मला शिंप्ल्यांची आठवण यायची
तुझी पापनीही तुझया डोळ्याना
अगदी मोत्यासारखी जपायची

मिठी
त्या दिवशी ची सर्वे कामे
मी  अलगद केली होती
जाताना मी  मात्र तुला
घट्ट मिठी मारली होती

चुक
तू जेव्हा चुक केलिस
मी  तुला माफ केल
मी  जेव्हा चुक केली
तू म्हणालिस पाप केल
- सागर 

अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी........

एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............
दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,
रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,
उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुलेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........
ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी.......................
‎" मानलेल्याना नात्याला ही पळवाट नेहमीच असते...
त्यासाठीच ते पकडून ठेवायचे असते......
नात असण्यात आणि मानण्यात जमीन आसमानाचा फरक असतो....
असलेल नात जड़ झाल तरी माणूस झिडकारू शकत नाही नाकारू शकत नाही...... 

मनातून उतरलेल्या व्यक्तिशी कोणतही नात ठेऊ नका........
अस नात फक्त त्रास देत......
पण मनाने जोडलेल्या नात्याला कधीही अंतर देवू नका.........
कारण ते हृदयात बसलेले असते "
हसू तिचे सुखी मी
उदास ती बेचैन मी
दु:ख तिला यातना मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला 


संग तिचा बेधुन्द मी
स्पर्श तिचा रोमांचीत मी
विरह तिचा मारतो मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला

नजर तिची घायाळ मी
बोल तिचे प्रसन्न मी
अबोला तिचा छळतो मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला

अश्रू तिचे कष्टी मी
राग तिचा अपराधी मी
मनातले तिच्या कळते मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला…..

मंगळवार, २८ डिसेंबर, २०१०

मी एकटाच बरा होतो 
तू अचानक आयुष्यात आलीस
काय घडत हे कळण्याआधीच
तू प्रेमाचा रंग भरून गेलीस

कोणातही न मिसळणारा मी
आता, तुझ्याशी तासनतास गप्पा मारतो
विषय काही नवा नसतो आपल्यात
पण, तुझ्याशी बोलायला वेळ कमी पडतो

छोटीशी गोष्ट अर्ध्यावर राहिलीतर
ती, मला उदयावर ढकलता येत नाही
तुझा फोन जर आला नाही तर
मला रात्रीला नीट झोप लागत नाही

भांडणही करून पाहिलं तुझ्याशी
पण, तुझ्याशिवाय मन करमत नाही
काय अवस्था असते त्या दिवशी माझी
ज्या दिवशी तू माझ्याशी बोलत नाही

मी माझ्यापेक्षाही जास्त तुझी काळजी करतो
तुझ्या चेहरयावर हसू पाहण्यासाठी धडपडतो
काय नशा तुझी प्रेमाची माझ्यावर
मी, आजही जीवापाड प्रेम तुझ्यावर करतो

दे वचन मला तू आज
गोड ओठांच्या चुंबनाची घेत साक्ष
कधी देणार नाही माझ्या प्रेमाला अंतर
आयुष्यभर फक्त माझीच राहशील तू निरंतर 

सोमवार, २७ डिसेंबर, २०१०

तू....


तू आलीस अन्
आयुष्य पुन्हा उभारी घेऊ लागलयं,
मन पुन्हा एकदा
कोणाच्या तरी प्रेमात झुरु लागलयं.....

तुझा तो निरागस चेहरा
डोळ्यासमोरून जाता जात नाही,
तुझा तो कोमल हात हातात घेतल्याशिवाय रहावत नाही.....

तू जवळ नसलीसना की
मन कसतरीच वागू लागतं,
अन् मग तुझ्याच आठवणीत
ते रात-रातभर जागू लागतं.....

आयुष्यभर साथ दे
हे एकच मागणं आहे,
कारण हे आयुष्य आता फक्त
तुझ्यासोबतच जगणं आहे....

शनिवार, २५ डिसेंबर, २०१०

आज तिच्या लग्नाची पत्रिका आली.

आज तिच्या लग्नाची पत्रिका आली..
.
.
क्षणात मी भूतकाळात गेलो
जुन्या आठवणीत मी रमलो
कठीण झाले भावनांना आवरणे
अश्रुनाही मी ना थांबवू शकलो..

सारे काही कालच्यासारखे वाटत होते
रंग आमुच्या प्रेमाचे जेव्हा बहरत होते
होते किती सुखाचे क्षण सारे
डोळ्यासामोरी चित्र उभे राहिले होते...

तिच्या लग्नाची पत्रिका आली..
मानल एक चटका लावूनी गेली
बंद करुनी ठेवल्या होत्या आठवणी
आठवणीना जागे करुनी गेली...

स्पर्श तिच्या प्रेमाचा तो 
अजूनही मी विसरलो नव्हतो,
हातावरील रेषात मी आजही
तिचाच हात शोधत होतो...

आज तिच्या लग्नाची पत्रिका आली..
वस्तुस्तिथी आज सारी बदललेली होती
कधी काळी माझ्यावर प्रेम करणारी,
लग्नाच्या बंधनात बंधणार होती...

विरहाचा नियतीला दोष देणे
केव्हाच मी बंद केले होते
गाली हास्य तिचे खिलत राहावे
हेच मागणे देवाकडे केले होते...

आज तिच्या लग्नाची पत्रिका आली..
.
.
थोड्या दिवसात लग्न तिचे होणार होते
साता जन्मांचे बंध जुळणार होते
दुखाची झळ ही तिच्यापर्यंत जावू नये
साकडे हे देवाकडे मी घातले होते...

गुरुवार, २३ डिसेंबर, २०१०

अशांसाठी ज्यानी या आयुष्यात खरेच कुणावर खुप प्रेम केले आहे पण ते प्रेम त्याना ह्या आयुष्यात मिळू शकले नाही ; अशाच एका खरया प्रेमीचे हे खरे ह्रुद्यास्पर्शी शब्द ....


""लाख क्षण अपूरे पडतात
आयुष्याला दिशा देण्यासाठी
पण, एक चुक पुश्कळ आहे
ते दिशाहीन नेण्यासाठी,,,,,,,,,,,,,,,,!

किती प्रयास घ्यावे लागतात
यशाचं शिखर चढण्यासाठी
पण, जरासा गर्व पुरा पडतो
वरुन खाली गडगडण्यासाठी,,,,,,,,,,,,!

देवालाही दोष देतो आपण
नवसाला न पावण्यासाठी
कितींदा जिगर दाखवतो आपण
इतरांच्या मदतीला धावण्यासाठी,,,,,,,,,!

किती सराव करावा लागतो
विजश्रीवर नाव कोरण्यासाठी
पण, जरासा आळस कारणीभूत ठरतो
जिंकता जिंकता हरण्यासाठी,,,,,,,!

कितीतरी उत्तरं अपुरी पडतात
आयुष्याचं गणित सुटण्यासाठी
कितीतरी अनुभवातनं जावं लागतं
आयुष्य कोडं आहे पटण्यासाठी,,,,,,,,,!

विश्वासाची ऊब द्यावी लागते
नात्याला जिवनभर तारण्यासाठी
एक अविश्वासाचा दगड सक्षम आहे
ते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी."

बुधवार, २२ डिसेंबर, २०१०

फक्त मिठीत घे...!!

फार काही नकोय ग तुझ्याकडून...
फक्त मिठीत घे...
एखाद्या संध्याकाळी मनात वादळ उभ राहिल्यावर..
फक्त मिठीत घे...
सगळी दुनिया विरोधात असल्यावर..
फक्त मिठीत घे...
जगण्याची लढाई लढताना खुप थकल्यावर..
फक्त मिठीत घे..
जगण्याची इच्छाच मरून गेल्यावर...
फक्त मिठीत घे...
मरणाच्या आधी दोन क्षण...
फक्त मिठीत घे....
फार काही नकोय ग तुझ्याकडून...
फक्त मिठीत घे..!!!
फक्त मिठीत घे...!!!