फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०१०

तू फक्त एकदाच ये.....!!


संपले सारे संयम,
तू फक्त एकदाच ये.....
उरले श्वास थोडे,
तू एकदाच जवळ घे.....

विवशताच हताश झाली,
तू फक्त एकदाच ये.....
आसवांची बरसात थकली,
तू एकदाच जवळ घे.....

प्राणांची ज्योत शमली,
तू फक्त एकदाच ये.....
सरणाची रास रचली,
तू एकदाच जवळ घे.....

स्वप्नांचे निखारे निमाले,
तू फक्त एकदाच ये.....
राख वा-यावर उडाली,
तू एकदाच जवळ घे.....!!
भाव माझ्या मनीचे,
जाणिले ना कुणी!
अश्रू दाटले डोळ्यात
पाहिले ना कुणी!

मुकेच राहिले शब्द,
ऐकले ना कुणी!
दुःख माझ्या हृदयाचे,
वाचले ना कुणी!

शब्द सुरेख कवितेचे,
गुंफले ना कुणी!
गीत मधुर ओठीचे,
गायले ना कुणी!

एकटाच चालत होतो,
साथ दिली ना कुणी!
भरकटलो होतो जरी,
मार्ग दावला ना कुणी!

नाही दुःख मनी,
नाही सुख मनी!
व्यथा माझ्या मनीच्या,
जाणिल्या ना कुणी!

~खर प्रेम~

आज तिने दिलेल्या वेदनेचे अश्रु,
माझ्या डोळ्यातून गळतायेत .......
आज माझ्या प्रेमाचे स्वर 
कुणा दुसर्याच्याच ओठात घुमतायेत......

आज माझ्या प्रेमफुलांचा सुगंध,
कुणा दुसर्याच्याच श्वासात दरवळतोय.....
मी मात्र वेदनेच्याच,
काट्यांमध्ये गुरफटतोय .......

आज तिने तिच्या मनातल,
माझ नाव पार पुसून टाकल आहे.....
मी मात्र तिच्या प्रेमाला जागा अपुरी पडू नये,
म्हणून माझ काळीजच कापून टाकल आहे.....

हाच फरक असेल कदाचित,
तिच्या प्रेमात अन माझ्या प्रेमात...

म्हणूनच
ती प्रेमात असूनही,
तिला खर प्रेम मिळाल नाही,
अन वेदनेत असूनही
माझ प्रेम कधी हिरावल नाही.....

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०

पुन्हा प्रेम करणार नाही.


पुन्हा प्रेम करणार नाही.....
भेट आपली शेवट्ची असुन
निरोप घेत आहे…
वरुन शांत असले तरी
ह्र्दयात रडत आहे…
जात आहे सोडुन मला
नाही अडवणार मी तुला…
असशील तिथे सुखात रहा
याच शुभेच्छा तुला…
निरोप तुला देताना
अश्रु माझे वाहतील….
काऴजाच्या तुकड्याना 
सोबत वाहुन नेतील…
त्या वाहणारय़ा अश्रुतही 
प्रतिबिंब तुझेच असेल…
निट निरखुन पहा त्याला
प्राण मात्र त्यात दिसेल…
वाट आपली दुभंगली आता
परत भेटणे नाही…
प्रवास जरी एक आपला
मार्ग एक होणे नाही…
आठवण तु ठॆवु नकोस
मी कधीच विसरणार नाही…
भेटणे तुझे अशक्य तरी 
वाट पाहणे सोड्णार नाही…
जातेस पण जाताना एवदे सांगुण जाशील का?
भेट्लो जर कधी आपण …
ओळख तरी देशील का?
जाता जाता थोडे तरी…
मागे वळुण पाहाशील का?
प्रत्यशात नाही तरी…
डॊळ्य़ानी बोलशील का?
बोलली नाही तु जरी…
नजर तुझी बोलेल का?
गोधंळलेल्या अत:करणाची… 
खबर मला सांगेल का?
कुठॆतरी ह्र्दयात इतिहास सारा आठवशील 
तो आठवण्यापुरता तरी तु…
नक्कीच माझी राहशील 
नजरेने जरी ओळखलेस तु… 
शब्दानीं मी बोलणार नाही
तुझ्या माझ्या आयुष्यात…
नसती वादळ असणार नाही
नेहमीच पराभव झाला तरी….
हक्क तुझ्यावर सांगणार नाही
पण तुझी शपथ पुन्हा प्रेम करणार नाही…. 

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०१०

किती छान असतं ना ? आपण कुणालातरी आवडणं...

किती छान असतं ना ?

आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी तासनतास आपलाच विचार करणं..
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं..
कुणाच्यातरी पर्सनल डायरित आपलं नाव असणं,
चार-चौघात कुणीतरी सतत आपलाच उल्लेख करणं,

किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी आपलं हसणं
काळजात साठवनं,
कुणालातरी आपला अश्रू
मोत्यासमान वाटणं..
किती छान असतं ना,
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी आपल्या फोनची
तासनतास वाट पाहणं,
आपल्याला एकदा ओझार्त पाहण्यासाठी,
तासनतास बस स्टॉप वर उभं राहणं,
देवसमोरही स्वताआधी
आपलं सुख मागणं,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी डोळ्यात जीव आणून
आपली वाट पाहणं,
आपल्या उपवासा दिवशी
त्यानं ही हटकून उपाशी राहणं,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी आपला विचार करत
पापनीवर पापनी अलगत टेकवनं..
झोपल्यावर मात्र
स्वप्नातही आपल्यालाच पाहणं..
खरच, खूप छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं

बुधवार, २९ सप्टेंबर, २०१०

रीती रिवाज

आजुनही का
न मज कळले
हे नियम कुणी
न कुठून आले

परंपरा न रीती
जुन्या रिवाजात
जगाशी नाते हे
जूळले का तुटले


===================================


जगाच्या रिती
लोकांची नाती
शोधता उत्तर
होते भटकंती

नियम वाढले
नियम बदलले
नवे करायला
जुने तोडले



====================================


मनात बिंबला होता एक पण
पहायला आले भलतेच अनेक
माझं मन आवड नाही विचारले
नशिबाचे खेळ उलटे का फिरले .........कळले नाही!!

रितीने घेतला हूंडा तर मजबूत
नांदवले आजवर उपकार समजुन
गो-या रंगावरचं पापुद्री प्रेम त्याच
जगण्या मरण्यातही आसतो फरक ..... कळला नाही !! 

सोमवार, २७ सप्टेंबर, २०१०

आठवण माझी कधीतरी येईलच तुला

तु कदाचीत रडशीलही

हात तुझे जुळवुन ठेव तु

सगळी आसवं तुझी त्यात सामावतील

जो थांबला तुझ्या हातावर

नीट बघ त्याच्याकडे

एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल..!



माझ्या आठवणी एखदयाला

सांगताना तु कदाचीत हसशीलही

जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता

नीट वापर त्याला

अडखळलेला तो शब्द मीच असेल..!



कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला

त्याच्या तेजाला तु निखरत राहशील

मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं

नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल..!



कधी जर सुटला बेधुंद गार वारा

मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील

मध्येच स्पर्शली तुला

जर उबदार प्रेमळ झुळुक

नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल..!

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०१०

आज पुन्हा सूर्य शांत आहे........
आज पुन्हा वारा मंद आहे...........
ती नसतानाही तिच्यावर लिहिण........
हा माझा छंद आहे..........

***************************


शब्दांचीच झालीये गफलत
मनाला जबाबदार धरू नकोस......
चुकलंय काय ते सांग
असा अबोला धरू नकोस.......

आजकाल मला स्वप्नच पडत नाही

आजकाल मला स्वप्नच पडत नाही
स्वप्नात तू नेहमीसारखी हसत नाही
उगाच हुंदक्यांच्या आवाजाने जाग येते
मग पुन्हा मला झोपच लागत नाही

आजकाल मला स्वप्नच पडत नाही
स्वप्नात तू नेहमीसारखी बोलत नाही
उगाच ओळखीच्या हाकेने जाग येते
मग पुन्हा मला झोपच लागत नाही

आजकाल मला स्वप्नच पडत नाही
स्वप्नात तू नेहमीसारखी चिडवत नाही
उगाच कसल्यातरी भासाने जाग येते
मग पुन्हा मला झोपच लागत नाही

आजकाल मला स्वप्नच पडत नाही
स्वप्नात तू नेहमीसारखी जवळ येत नाही
उगाच मी दचकल्याने मला जाग येते
मग पुन्हा मला झोपच लागत नाही

आजकाल मला स्वप्नच पडत नाही
स्वप्नात तू वळून पाहत नाही
उगाच तुला थांबवताना मला जाग येते
मग पुन्हा मला झोपच लागत नाही

आजकाल मला स्वप्नच पडत नाही .........

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०१०

आठवणीं

इथला प्रत्येकजण हा,
कोणासाठी तरी थांबत असतो!
येणारा मात्र नेहमी,
आठवणींसारखा लांबत असतो !

म्हणून आठवणींच्या विश्वात,
तिला न्यायला मी घाबरतो !
जाताना जरी असलो सोबत,
तरी यायला मात्र विसरतो !

आठवणींच्या त्या विश्वात,
फक्त आम्ही दोघेच असतो !
दोघांच्याच आठवणीत,
आम्ही आमच विश्व सामावतो ! 

आता मात्र आठवणींची,
मलाच भिती वाटते !
कारण आगीमध्ये मेण,
विरघळून जात असते !

तुझ्या वाटेवरचे डोळे,
आता काही केल्या हटत नाही !
रडून रडून थकले डोळे,
आता पाणीही काही आटत नाही!