फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शनिवार, ७ ऑगस्ट, २०१०

आठवण.......... ?

आठवण ठेउन ठरवले
तिला आता आठवायचे नाही.

कारण..........

तिच्या सोबतचे क्षण न क्षण
सोडत नाहीत आठवणी.

आज मात्र क्षण न क्षण
टोचत राहातात आठवणी.

वेळेच भान न ठेवता 
भिडस्तपणे येतात तिच्या आठवणी.

मग, मीही भीडभाड न ठेवता 
घुसतो तिच्या आठवणीत.

मोरपंखा सारख्या अलगद
येतात तिच्या आठवणी.

मग, दिवसभर मला,
ओरबाडत राहातात तिच्या आठवणी.

म्हणुनच..........

आठवण ठेउन ठरवले
तिला आता आठवायचे नाही.

पण.....

तिची आठवण एवढी कोरल्या गेलीय,
काय ठरवले तेच आता आठवत नाही.

शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०१०

सोडले मी


मैफिलीत तुजीया येणे सोडले मी
घेतल्या जखमांना उकरणे सोडले मी |

ऋतूचक्रात माझ्या पाऊस नुरला काही
तुला साद घालणे आता सोडले मी |

रंग मेहेन्दिचे तुझ्या हातावरी सजले जेंव्हा
मी माझे तुझ्यात रंगणे सोडले मी |

आठवात तुझ्या हे जीवन आहे जायचे
आताशा हळू हळू मरणे सोडले मी |

आहे आयुष्य अजूनही पुढे बाकी;
"बेदील" करून तुला, वाहने सोडले मी |

ती आहे,,,,,,, पण ती दूर आहे


तिचा विचार करून
रात्र रात्र जागता येतं
ती आत्ता हवी म्हणून
वेड्यासारखं वागता येतं
हिरमुसुन मन कधी
खूपच खट्टू होतं
ती जवळ नसल्याचं शल्य
बिकट घट्ट होतं
नुसता स्वतःशीच संवाद
आता नको आहे
ती आहे
पण ती दूर आहे

तुझी खूप आठवण येते
फोनवर सांगता येतं
तसे सांगितले तर तिचही
मन लगेच हळवं होतं
ती फोनवरच म्हणते
कधी भेटशील रे?
श्वास दीर्घ होतो दोघांचा
वाहू लागते उष्ण वारे
किती वेळ बोलता येणार
शेवटी फोन ठेवावा लागतो
मोठ्ठा दगड हृदयावर
रोज रोज घ्यावा लागतो
बोलायचे राहून गेलेले
किती अव्यक्त आहे
ती आहे
पण ती दूर आहे

बुडतो आहे मी!!!

पाणावलेले डोळे 
ओलावलेल्या पापण्या 
कशा व्यक्त करू मी...
...दाटलेल्या भावना? 

भावनांचा पूर 
दाटून आलेला उर 
मन...सैरभैर...
जसं आत्म्याशीच वैर! 

वाहत होतीस तू 
वाहत आहे मी !!
तीरावर थांबलेली तू 
बुडतो आहे मी!!!

प्रेम म्हणजे.....

प्रेम म्हणजे निरभ्र आकाश,
निर्मल, निरपेक्ष भावनेने व्यापलेले....
एक भला चंद्रमा, 
त्याच्या प्रकाशाने चांदण पडलेल....!!

प्रेम म्हणजे अथांग समुद्र, 
डोळ्यांचीही मजल ना पोचलेला....
नावेवरचा एकच नावाडया, 
अंतरी दूर पोहचलेला....!!

प्रेम म्हणजे निसर्ग, 
हिरवा शालू पांघरलेला....
धरतीच्या मिलनासाठी, 
वरुणराजा बरसलेला....!!

मरणाला मरणाची भिती वाटावी

मरणाला मरणाची भिती वाटावी
मरणवाट ती मला भेटावी......

काळजात काळजाची स्पंदन घोटावी
आयुष्याची सरती वर्ष हळूवर लोटावी 

कळुन ती न कळावी
रीत अशी ऊरी बाळगावी 

नेहमी वाट नवी शोधावी 
हुरहुर ती नवी अनुभवावी 

पुरुन ऊरनार ती आठवण जपावी 
दुःखातही जी भरभरुन हसावी

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०१०

मी पुन्हा भेटेन

मी पुन्हा भेटेन ....
त्याच जुन्या वळणावर
नव्या वाटा शोधताना

मी पुन्हा भेटेन ....
त्याच बेधुंद वाऱ्यासोबत
काळाशी स्पर्धा करताना

मी पुन्हा भेटेन ....
त्याच बेफान लाटांसोबत
आकाशाला गवसणी घालताना

मी पुन्हा भेटेन ....
त्याच हसणाऱ्या फुलांसोबत
आनंदाचे साम्राज्य पसरवताना

मी पुन्हा भेटेन ....
त्याच तळपणाऱ्या सूर्यासोबत
नव्याने तेजस्वी होताना

मी पुन्हा भेटेन ....
त्याच हळव्या आठवणींमधून
नकळत पावसासोबत बरसताना

आता पुन्हा जगावस वाटत नाही

- - - - उगाच जास्त बोलत नाही
मनातलं गुपित खोलत नाही 
चेहऱ्यावर हसू आता दिसत नाही
आता पुन्हा जगावस वाटत नाही

उगाच सुखाची व्याख्या जुळवत नाही
दुःखालाही सोबत घेत नाही
विनाकारण आता प्रश्न पडत नाही
आता पुन्हा जगावस वाटत नाही

स्वप्न आता पूर्वीसारखी पडत नाही
चित्रही आता रंगत नाही
उगाच फुलांचा सुगंध शोधत नाही
आता पुन्हा जगावस वाटत नाही

kahi chotya kavita

तू साथ सोडल्यावर 
माझी स्वप्नंच घाबरून गेली...
मलाही भिती वाटलीच
पण, तुझ्या फ़सवणुकीची शिक्षा 
मी त्या निष्पाप स्वप्नांना का द्यावी?
त्यांना जन्म दिलाय तर त्यांचं
संगोपन करणं.. हे कर्तव्य 
तुझ्यासारखं मीही विसरावं? - - - -


==========================================


आज तुझ्याही डोळ्यातुनी
पाऊस बरसु दे
डोळ्यातुनी तुझ्या गालावर
मला ओघळु दे 



==========================================


---- तुला आठवणीने विसरण्याची
रोजच चालते धडपड माझी
पण चुकवत मला एखादी
येतेच चोरआठवण तुझी



==========================================



आठवतात का तिला त्या आठवणी.....?

आले नभ भरुनी ..
दाटतात त्या आठवणी ..

पावसाच्या त्या थेंबात
दिसतात त्या आठवणी...

डोळ्यात अश्रू बनुनी
उभे राहतात त्या आठवणी...

दिवसाच्या त्या प्रारंभास
पहिला विचार बनतात त्या आठवणी...

रात्रीच्या त्या काळोखात
जागवतात त्या आठवणी...

कामाच्या त्या ओघात
सतावितात त्या आठवणी...

चहाच्या त्या वाफेतही
दरवळतात त्या आठवणी...

दारूच्या त्या नशेतही
धुंदावितात त्या आठवणी...

पाहत आहे वाट अजूनही तिची...
पण...आठवतात का तिला त्या आठवणी.....?...आठवतात का तिला त्या आठवणी.....